<-- home

शेवटची लाट

थकला असशील, बैस जरासा
जोड श्वासाला श्वास
रण सोडण्याचा नको विचार
दिसलं जरी सारंच भकास
हिमविवरात अडकलास
तरी पांढरं निशाण रोवू नकोस
आली दाटून शेवटची लाट
तरी जहाज कधी सोडू नकोस
आली दाटून शेवटची लाट
तरी जहाज कधी सोडू नकोस