मीच तो, मीच तो...
March 2, 2011
‘यदा-कदाचित’ नाटक कोणी पाहिलं असेल त्यांना आठवेल कदाचित, नाटकातील सगळी पात्रं “मीच तो… मीच तो…” असा गजर करत प्रवेश करतात. मी देखील अगदी तसाच निघालो. माझी पाटी, माझी पेन्सील वरून जे भांडत सुटलो (ते व्हाया माझं जर्नल, माझी बाईक) ते अगदी माझं केबिन, माझी खुर्ची पर्यंत जाऊन पोहोचलं.
असले विचार मी एकेकाळी करत होतो याची जाणीव झाली की स्वतःचीच इतकी लाज वाटते! माणूस स्वतःभोवती एक राज्य तयार करू पाहतो आणि त्या राज्याचा तोच अनभिषिक्त सम्राट असतो. कोणी कसं वागावं आणि कसं वागू नये हे ठरवत असतो. ठरल्याप्रमाणे गोष्टी जमून आल्या नाही तर मग तो रुसतो, चिडतो. त्याला माणसांचा आणि जगाचादेखील राग येतो. कसंय ना… स्तुती ऐकून जीव सुखावतो. पण ही गर्वाची शूद्रता तरी किती दिवस लपून राहणार? इंग्रजीत कोण्या शब्दकाराने हे जाणले होते आणि म्हणून त्याने गर्विष्ठपणा आणि शूद्रता हे दोन्ही अर्थ एकाच शब्दात बद्ध केले.
vanity of vanities… गर्वाची शूद्रता की शुद्रतेचा गर्व?