देव
April 16, 2012
“सर.. सर.. एक मिनिट..”
“काय रे?”
“ “
“अरे बोल ना…“
“सर, देव असतो का?”
“ …. तुला काय वाटतं?”
“माझ्या मते लोकांनी उगाच स्तोम माजवलं आहे. देव नसतोच मुळी. ती एक बाष्कळ संकल्पना आहे. प्रत्येक घटनेला स्पष्टीकरण आहे. निसर्ग देखील शास्त्रीय नियमांनुसारच चालतो. सर, मी म्हणतोय ते बरोबर आहे ना?”
“हम्म.. मधल्या सुट्टीत डबा खाऊन झाला की ये स्टाफरूम मध्ये.”
“सर..”
“झाला डबा खाऊन?”
“हो”
“बरं.. एक काम कर, स्टूल घे आणि कपाटावरचा तो ग्लोब घेऊन ये.”
“ …??…. आणतो.” … “हं.. हा घ्या सर.”
“काय रे, काय वाटतं तुला? कोणी बनवला असेल हा ग्लोब?”
“ … कोण्या एका सुताराने बनवला असेल… का?”
“जर हा साधा ग्लोब बनवायला सुताराची गरज पडते, तर ही पृथ्वी बनवणारा कोणीतरी असेलच ना.. सगळ्यांचा सुतार.. देव.”
मी लहान असताना बाबांनी सांगितलेली गोष्ट.